भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं

sonvala houn ton vonvalen jadalen | sandimandi bolatondin bijin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥ एकसरीं केलीं कलेवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥ संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥२॥ तुका म्हणे हें तूं ब्रम्हांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥३॥