भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापै

sola sahasra houn yeten | bharalen riten ahmapai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापै ॥१॥ ऐसे तुम्हां ठायाठाव । म्हणे देव संपादे ॥ध्रु.॥ कैची चिरामध्यें चिरे । मना बरें आलें तैं ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । अंगसंगा भिन्न करा॥३॥