भजनी मालिका

भजने

सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सुंदर तें ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीतीं गाये ॥१॥ सुंदर तें ध्यान नंदाच्या अंगणीं । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुंदर नारायण गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥१॥ सुरस सर्व तीर्थें आदि पुरातन । केली नारायणें तीर्थयात्रा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुंदर बाळका म्हणती गोपिका यशोदा रोहिणी सन्मुखा । आदि नाटका नाच व्यापका मिळालिया अनेका । सर्व पाळका सकळ चाळका सुखदाता सकळिका । धिमी धिमी बाळा नाचे वहिला म्हणती मायादिका ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

सुंदर माझें जातें गे फिरे बहुतेक ओव्या गाऊं कौतुके तूं मेरे बा विठ्ठला ।।१।। जीवशिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे। लावुनी पांचीं बोटें गे तूं येरे बा विठ्ठला ।। २ ।।

रचनाकार: संत जनाबाई

सुंदर मुख साजिरें कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं । गोपवेष शोभे खांदा कांबळी हातीं काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥ मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ । देती गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फ़ांकलें । तें व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥ कमळनयन सुमन फ़ांकलें । त्या परिमळा आथिलें । मकरंदीं वो माय ॥ध्रु०॥

सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथें कुंठित गे माय ॥१॥ ब्रह्मा वेडावलें ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झालें गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुदर्शन घेऊनि हातीं । पावला तो लक्ष्मीपती ।देखतांची श्रीपती । तन्मय बाळ जाला ॥१॥ बाळकें धरिले चरण । देवें दिधलें आलिंगन । करें कुर्वाळुनी वदन । चुंबनाते दिधले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुदर्शन धरिलें शिरीं । क्षेत्राभोंवतें फिरे वरी । जगदात्मा राज्य करी । पांडुरंग तेथींचे ॥१॥ शिव सांगे स्कंदाप्रती । पंचक्रोशीमाजीं वस्ती । कृमी कीटकादि जीवयाती । ते ते होती चतुर्भज ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्तीं गोपाळ द्दढ धरिला ॥१॥ तयाचें चरित्र ऐका सावधान । तेणें जन्ममरण दूर होती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव