भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदामा सवंगडी । त्याची बहु गोडी हरीसी

sudama savangadi | tyachi bahu godi harisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुदामा सवंगडी । त्याची बहु गोडी हरीसी ॥१॥ बाळपणीं खेळले खेळ । विद्या सकळ गुरुगृहीं ॥२॥ कृष्ण द्वारकेसी आला । सुदामा राहिला सुदामपुरीं ॥३॥ एका जनार्दनीं साचे । परिसा चरित्र भक्ताचें ॥४॥