भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर नारायण गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनीं

sundar narayan gauravile phar | kela namaskar vaishnavannin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुंदर नारायण गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥१॥ सुरस सर्व तीर्थें आदि पुरातन । केली नारायणें तीर्थयात्रा ॥२॥ विसोबा खेचर परिसा भागवत । अनेक ते संत बैसविले ॥३॥ मध्ये निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक । पाहाती कौतुक गौतमीचें ॥४॥ दशमीचे दिवशीं केलें तें प्रस्थान । विधि नारायण सांगतसे ॥५॥ नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ । जालासे विकळ निवृत्तिराज ॥६॥