भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर विभुति लावी अंगीं । मिरवी जगीं भूषण

sundar vibhuti lavi angin | miravi jagin bhushan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुंदर विभुति लावी अंगीं । मिरवी जगीं भूषण ॥१॥ घालूनियां गळां माळा । वागवी गबाळा वोंगळ ॥२॥ नेणे कधीं योगयाग । दावी सोंग भाविका ॥३॥ एका जनार्दनीं भाव । नाहें तेथें कदा देव ॥४॥