भजनी मालिका

भजने

सर्वांभूतीं नांदे सर्व नारायण । सर्व संस्थापन पां-डुरंग ॥१॥ अगा देववंद्या अगा गोपवेशा । पावन परेशा पर-मार्थासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्वांभूतीं भजन हेंचि पैं चोखडें । ब्रह्म माजीवडे करोनि घेई ॥१॥ सफळ सर्वदा जप हा गोविंदा । न पावाल आपदा नाना योनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्वांभूतीं हरी आहे हेंचि साच । मायाजाळ न छळे भाविकांसी ॥१॥ सर्व ब्रह्म ऐसे वेद बोले गाढा । ब्रह्मींचा पवाडा अगम्य तो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥ तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्वांमाजीं सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जें कां ॥१॥ सहा चार अठरा वर्णिताती कीतीं \ नामें मोक्षप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वांमाजीं सार नाम श्रीहरीचें । अखंडीत वाच जप करी ॥१॥ निशिदिनीं ह्रदयीं ध्यातो शूलपाणि । पाविजे निर्वाणीं मोक्षपद ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्वांमाजीं सार नाम हें देवाचें । सर्व साधनांचे सार जें कां ॥१॥ चार साहा आणिक आठरा वर्णिती । नामें निजप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥ पाहातां आधीं अविदया‍चि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सलगीनें सर्प हातीं तो धरिला । परि डंश तो वहिला करी बापा ॥१॥ तैसें विषयासी सलगी पैं देतां । नेती अधःपाता प्राणिमात्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सलीलकमलदलाक्ष राजीवलोचनु । परे परता पाहतां निवे आमुचें मनु ॥१॥ कान्हया परम गोजरीया । कान्हया परम गोजरीया ॥ध्रु०॥

रचनाकार: संत एकनाथ

संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहिजण अतिक्रोधें ॥१॥ आज्ञा होतांचि चालिले मेघ । पवन त्याही पुढें सवेग । तेणें अभ्रें दाटली अनेक । पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥ लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सवें तीर्थें मिळालीं अनंतें । तीं सुखी करुनी कृतार्थें । संवत्सरा जावोनी सोपानातें । समाधीसी बैसंवू ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

सव्य हातें नगर घेती ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीसी ॥१॥ परतले देव आणि सुरगण । चाललीं विमानें वैष्णवांचीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसाई परजनीं बुडतों महाडोहीं । सोडविण्या येई गुरुराया ॥१॥ गुरुराया धांवें लवदसवडी । जाती एकघडी युगाऐसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसार असार जाणोनि निर्धार । केलासे विचार सनकादिकीं ॥१॥ नामीं आतुडले नामीं आतुडले । साधन साधिलें हेंचि एक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ