भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांभूतीं नांदे सर्व नारायण । सर्व संस्थापन पां-डुरंग

sarvambhutin nande sarva narayan | sarva sansthapan pan-durang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वांभूतीं नांदे सर्व नारायण । सर्व संस्थापन पां-डुरंग ॥१॥ अगा देववंद्या अगा गोपवेशा । पावन परेशा पर-मार्थासी ॥२॥ मूर्त अमूर्ताचा मुक्त परांगता । सर्व मायातीता साक्षिरूपा ॥३॥ नामा म्हणे देवांदानवां जिंकिसी । ते भाके आम्हांसी सांभाळावें ॥४॥