भजनी मालिका
← भजनांकडे परत

सव्य हातें नगर घेती ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीसी

savya haten nagar gheti rushishvar | kela namaskar samadhisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सव्य हातें नगर घेती ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीसी ॥१॥ परतले देव आणि सुरगण । चाललीं विमानें वैष्णवांचीं ॥२॥ निवृत्ति मुक्ताबाई चांगदेव संगें । रुक्मिणी पांडुरंग समुदायेंसी ॥३॥ नामा म्हणे देव गंधर्व ऋषिमुनी । जाती उत्तरायणीं निवृत्तिराज ॥४॥