भजनी मालिका
← भजनांकडे परत

सलगीनें सर्प हातीं तो धरिला । परि डंश तो वहिला करी बापा

salaginen sarpa hatin to dharila | pari dansh to vahila kari bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सलगीनें सर्प हातीं तो धरिला । परि डंश तो वहिला करी बापा ॥१॥ तैसें विषयासी सलगी पैं देतां । नेती अधःपाता प्राणिमात्र ॥२॥ विष उत्तम चांगलें घातलेंसे मुखीं । परि राण शोखी क्षनमात्रें ॥३॥ जाणोनी जाणोनीं नको भुलूं वायां । एका जनार्दनीं पायां भजे आधीं ॥४॥