भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाई परजनीं बुडतों महाडोहीं । सोडविण्या येई गुरुराया

sansai parajanin budaton mahadohin | sodavinya yei gururaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसाई परजनीं बुडतों महाडोहीं । सोडविण्या येई गुरुराया ॥१॥ गुरुराया धांवें लवदसवडी । जाती एकघडी युगाऐसी ॥२॥ माझी चित्तवृत्ती अज्ञान हेंगाय । एका जनार्दनीं पाय दावीं डोळा ॥३॥