भजनी मालिका

भजने

राम मंत्राचिया आवर्ती । घडती जयासी पुढतोपुढती । त्याचा जन्म धन्य ये क्षितीं । सर्व कुळाशीं तारक ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥ राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राम म्हणतां तरे जाणता नेणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥ राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राम म्हणतां राम चि होईजे । पदीं बैसोन पदवी घेईजे ॥१॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राम म्हणोनि दीन येती काकुलती । त्याच्या यातनेचे दोषे सांगावे किती ॥१॥ काय साचलें नाठवे पाप । नामें निष्पाप महादोषी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राम राजीवलोचना । करुणा निधी भक्तजना । यातायातीनिवारणा । तूं पावना स्वामिया ॥१॥ जगद्रुपा जळदगहना । जगद्‌गुरु सीतापती जगज्जीवना ।

रचनाकार: संत नामदेव

राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥१॥ मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राम राम ध्वनी जयाचे मुखासी । धन्य पुण्यराशी पावन झाला ॥१॥ सदोदित नाम जपे श्रीरामाचें । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राम रावण रणांगणीं । युद्धा मीनला नीज निर्वाणीं । येरयेरातें लक्षुणीं । स्वयें विधों पाहे ॥१॥ तंव गज ध्वजीं राम । रामाचि धनुष्यबाण । रामरुप आपण । आपणा देखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला ॥१॥ रीस आणि वानर राक्षसहि पहाती । सर्वां एकची मुक्ति रामसंगे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राम सर्वांच्याहृदयीं आहे । धरितां त्या हृदयस्थाची सोये । तेथें रामरावणु कोठें आहे । सांग माय यथार्थ ॥१॥ भोगितां हृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तियासी । तेथें रावण कैंचा आणिसी । जें तयासी भोगावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राम हीं अक्षरें सुलभ सोपारी । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥ मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा