भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम म्हणतां रामचि होसी । भाक घेईं मजपाशीं

ram mhanatan ramachi hosi | bhak ghein majapashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राम म्हणतां रामचि होसी । भाक घेईं मजपाशीं ॥१॥ लवण समुद्रीं जागा मागे । तेंहि समुद्र झालें अंगें ॥२॥ वात दीपासंगें गेली । तेहि दीप अंगें झाली ॥३॥ नामा सांगे भाविक लोकां । नाम घेतां राहूं नका ॥४॥