भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम हृदयी आठवावा

ram hrudayi athavava

रचनाकार: संत बोधले · अभंग
राम हृदयी आठवावा । आवडी प्रीतीने गावा ॥१॥ तोडी अविद्या समुळ । सुख होईल प्रबळ ॥ २॥ पाहता संसार हाचि सार । याणे उतरु पैलपार ॥३॥ नलगे करणे सायास । हाचि सोपा उपदेश ॥४॥ बोधला म्हणे दृढ धरा । तारु निर्वाणीचा खरा ॥५॥