भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम राम दोनी अक्षरें

ram ram doni aksharen

राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागऱ्यावघोषें गा ॥ध्रु.॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥ निज घेउनिया फिरती । ऐक वेळा जाणविती । धरूनियां राहाचित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं ॥३॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥