भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं

ram rajya ram praja lokapal | ek chi sakal dujen nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥१॥ मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥ मोडलें हें स्वामी ठायाठाव सेवा । वाढवा तो हेवा कोणा अंगें ॥२॥ तुका म्हणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हें चि आतां ॥३॥