भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम म्हणोनि दीन येती काकुलती । त्याच्या यातनेचे दोषे सांगावे किती

ram mhanoni din yeti kakulati | tyachya yataneche doshe sangave kiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम म्हणोनि दीन येती काकुलती । त्याच्या यातनेचे दोषे सांगावे किती ॥१॥ काय साचलें नाठवे पाप । नामें निष्पाप महादोषी ॥२॥ चित्रगुप्त जव पाहे वही । कोरडें पान रेघही नाहीं ॥३॥ खोडी ना मोडीसमुळ उडे । एका जनार्दनीं नामें पाप झडे ॥४॥