भजनी मालिका

भजने

माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥ तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार झालों आतां ॥१॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो ॥१॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझिये मनीचा फिटला बेहो । देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥ कळिकाळ ते काय बापुडें रंक । होऊनि मशक ठेलें पुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिये वाचेसी नाहीं धीर । प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥ तुमचे कृपेचा हा महिमा । पुरुषोत्तमा अगाध ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥ कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझी कोण गति सांग पंढरिनाथा । तारिसी अनाथ कीं बुडविसी ॥१॥ मनापासोनियां सांग मजप्रती । पुसें काकुळती जीवाचिये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझी पूजा हेंचि अर्चन । तुमचें नामसंकीर्तन । नेणें करुं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । अत्यंत मूढ आहे माझी मती । नेणें करुं तुमची स्तुती । अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा