भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी कोण गति सांग पंढरिनाथा । तारिसी अनाथ कीं बुडविसी

majhi kon gati sang pandharinatha | tarisi anath kin budavisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझी कोण गति सांग पंढरिनाथा । तारिसी अनाथ कीं बुडविसी ॥१॥ मनापासोनियां सांग मजप्रती । पुसें काकुळती जीवाचिये ॥२॥ न बोलसी कां रे धरिला अबोला । कोणासी विठ्ठला शरण जाऊं ॥३॥ कोणासी सांकडें घालावें हें सांग । नको करूं राग दीनावरी ॥४॥ बाळकासी जैसी एकचि वो माये । तैसे तुझे पाये आम्हांलागीं ॥५॥ नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥६॥