भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटीं

majhi andhalyachi kathi adakali kavane betin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझी आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटीं ॥१॥ आतां सांगू मी कवणासी । धांवें पावें हषीकेशी ॥२॥ तुजवांचूनी विठ्ठला । कोणी नाहीं रे मजला ॥३॥ माथा ठेवीं तुझे चरणीं म्हणे नामयाची जनी ॥४॥