भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटीं

majhi andhalyachi kathi | adakali kavane betin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझी आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटीं ॥१॥ आतां सांगूं मी कवणासी । धांवें पावें ह्रषिकेशी ॥२॥ तुजवांचुनी विठ्ठ्ला । कोणी नाहींरे मजला ॥३॥ माथा ठेवीं तुझे चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥