भजनी मालिका

भजने

मज कांहीं सीण न व्हावा यासाठी । कृपा तुम्हां पोटीं उपजलीं ॥१॥ होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मज चालतां आयुष्यपंथें । तारुण्यवन पातलें तेथें । मदमछरादि श्वापदें बहुतें । आलीं कळकळीत मजपाशीं ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

मज जे अनुसरले काय वाचा मनें । त्याचें चालवणें सर्व मज ॥१॥ ऋणवई त्यांचा आनंद जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१॥ घेऊनी अवतार । करी दृष्टांचा संहार माझा हा बडिवार । तयाचेनि उद्धवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूर्तीमंत । म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भक्ती ऐसा दिसें ॥१॥ ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आस लागलोंसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मज तों नवल वाटतसें जीवीं । आपुली पदवी विसरले ॥१॥ कवणिया सुखा परब्रह्म भुललें । गुंतोनी राहिलें भक्त भाके ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥ कवणिया सुखा परब्रम्हा भुललें । गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मज तों सांभाळिलें संती । धरिलें हातीं दीन म्हणुनी ॥१॥ सांगतां नये विश्वास लोकां । बाधी अशंका ज्याची त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा ॥१॥ मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥ धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥१॥ नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम