भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज जे अनुसरले काय वाचा मनें । त्याचें चालवणें सर्व मज

maj je anusarale kay vacha manen | tyachen chalavanen sarva maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मज जे अनुसरले काय वाचा मनें । त्याचें चालवणें सर्व मज ॥१॥ ऋणवई त्यांचा आनंद जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥ तयांचियां द्वारीं लक्षीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणें ॥३॥ सर्व जडभारी जाणे योगक्षेम । एकाजनार्दनीं नेम जाणा माझा ॥४॥