भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज कांहीं सीण न व्हावा यासाठी । कृपा तुम्हां पोटीं उपजलीं

maj kanhin sin na vhava yasathi | krupa tumhan potin upajalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज कांहीं सीण न व्हावा यासाठी । कृपा तुम्हां पोटीं उपजलीं ॥१॥ होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥ आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हां भय लोकां आहे मनीं ॥२॥ तुका म्हणे आतां संचिताचा ठेवा । वोढवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥