भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा

maj nashta maya moh nahin lobh | adhik ho kshobh adaracha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥ धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥ मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥ न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥३॥ तुका म्हणे देखोनियां काई । पांडुरंगा पायीं राखियेलें ॥४॥