भजनी मालिका

भजने

जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥ तातडिने मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जाणसी तें करीं कृपाळुवा हरि । लाज सर्वांपरी आहे तुज ॥१॥ आरूष साबडें मी कांहीं नेणें वेडें । जन्मोनि सांदडें केलें तुज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी वायां ॥१॥ मृत्तिकेचें घर बांधितां खचलें । तैसें परि जाहलें न कळे तुज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥१॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥१॥ किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥ जाणीव शहाणीव येथें नाहीं काम । वाचे वदतां नाम सर्व साधे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥ नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेनें कैसें मज नागविलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाणीव शाहणीव बाहियेलें वोझें । तेणें चरण तुझे अंतरले ॥१॥ मज नेणतेंचि करी मज हरी । या लौकिकाबाहेरी काढी मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जाणीवचि माझी गिळूनि ठेला । नेणीवेतें प्याला निपटूनियां ॥१॥ निढळवाणें मज करुनि ठेविलें । जीवाचेंही हरिलें जीवपण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा