भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणीव नेणीव भगवंती नाहीं

janiv neniv bhagavanti nahin

जाणीव नेणीव भगवंती नाहीं । हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥ नारायणहरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीव जंतूंसी केंवि कळे । ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥३॥