भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणीव शाहणीव बाहियेलें वोझें । तेणें चरण तुझे अंतरले

janiv shahaniv bahiyelen vojhen | tenen charan tujhe antarale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाणीव शाहणीव बाहियेलें वोझें । तेणें चरण तुझे अंतरले ॥१॥ मज नेणतेंचि करी मज हरी । या लौकिकाबाहेरी काढी मज ॥२॥ तुझिया नामाचें मज लागो पिसें । देहीं देहन दिसे ऐसें करी ॥३॥ नामा म्हणे तुज जाणसी तरी येकचि जाण । रहित कारण कल्पनेचें ॥४॥