भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें

janiv pheda janiv pheda | janivenen veda laviyelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥ नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेनें कैसें मज नागविलें ॥२॥ नेणपणें मी सर्वांसी मानी । जाणीव येतां कोण्हा न मानी ॥३॥ जाणीण नेणीव नेणेंचि कांहीं । एक जनार्दनीं लागला पायीं ॥४॥