भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार

janaven te kay nenaven te kay | dhyave tujhe pay hen chi sar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥१॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥२॥ जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥३॥ तुका म्हणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥४॥