भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना

janivechya bharen chempala ur | sada burabur sare chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥१॥ किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥ मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥ तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥३॥