भजनी मालिका

भजने

अरूप रूपासी आलें । परब्रह्म ठसावलें । भक्ता पुंड-लिका फावलें । गौप्य झालें प्रगट ॥१॥ धन्य धन्य भिंवरातट । चंद्रभागा हे निकाट । धन्य धन्य वाळूवंट । मुक्तिपेठ पंढरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अरे अरे मना । सत्य सत्य धरी ध्याना । पंढरीचा राणा । वेध ठेवीं तयाचा ॥१॥ तुज नाहें रे बंधन । सहज आकळे ब्रह्माज्ञान । वाउगें शोधन । नको करूं ग्रंथाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अरे अलगटा माझिया तूं मना । किती रानोराना हिंड-विसी ॥१॥ विठोबाचे पायीं दृढ घालीं मिठी । कां होसी हिंपुटी वांयां-विण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥ येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अरे मना तूं मर्कटा । पापिया चांडाळा लंपटा । परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा ॥१॥ अरे तुज पापावरी बहु-गोडी । देवाधर्मीं नाहीं आवडी । तेणें न पावसी पैल थडी । कर्म बांधवडी पडिसील ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अरे मना शोक करिसी किती । हे तंव वांयां धनसंपति । आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हातीं । हें अवघें अंतीं जायजणें ॥१॥ एक अर्बुद साठीं कोटि देखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा । सात शतें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झालें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अरे विठोबा आतां पाहे मजकडे । कांज्रे केलें वेडें बाळ माझें ॥१॥ तुझें उच्छिष्ट खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अरे विठोबा आतां पाहे मजकडे कारे केलें बेर्डे बाळ माझें ।।१।। तुझें उच्छिष्ट खादले त्वां काय दिधलें। भलें दाखविलें देवपण ।।२।।

रचनाकार: संत गोणाई