भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे मना तूं पापिष्टा

are mana tun papishta

अरे मना तूं पापिष्टा । किती हिंडसी रे तूं नष्टा ॥ सैरा सिणसी रे फ़ुकटा । विठ्ठलविनटा स्थिर होई ॥१॥ येणें पैलपार पावसील ॥२॥ तूं अनिवार नावरसी । तुझेनि संगें नाडले ऋषी । तूं तंव अपभ्रंशीं पाडिशी । म्हणोनि गेले गुरुसी शरण ॥३॥ न सोडी हरिचरण । नाहीं नाहीं जन्ममरण । अविट सेवी नारायण । तेणें मी तूं पण एक सिध्द ॥४॥ ज्ञानदेव शरण हरी । मन हिंडे चराचरी । न सोडी चरण अभ्यंतरी । नित्य श्रीहरी ह्रदयीं वसो ॥५॥