भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे मना तूं वांजटा

are mana tun vanjata

अरे मना तूं वांजटा । सदा हिंडसी कर्मठा । वाया शिणशीलरे फ़ुकटा । विठ्ठल विनटा होई वेगीं ॥१॥ तुझेन संगें नाडले बहु जन्म भोगिताती नित्य कोहूं । पूर्व विसरलें ॐ हूं सोहूं । येणें जन्म बहूतांसी जाले ॥२॥ सांडि सांडि हा खोटा चाळा । नित्य स्मरेरे गोपाळा । अढळ राहे तूं जवळा । मेघश्यामा सांवळा तुष्टेल ॥३॥ न्याहाळितां परस्त्रीं । अधिक पडसीं असिपत्रीं । पाप वाढिन्नलें हो शास्री । जप वक्त्री रामकृष्ण ॥४॥ बापरखुमादेविवर । चिंती पा तुटे येरझार । स्थिर करीं वेगीं बिढार । चरणीं थार विठ्ठलाचे ॥५॥