भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे अलगटा माझिया तूं मना । किती रानोराना हिंड-विसी

are alagata majhiya tun mana | kiti ranorana hind-visi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अरे अलगटा माझिया तूं मना । किती रानोराना हिंड-विसी ॥१॥ विठोबाचे पायीं दृढ घालीं मिठी । कां होसी हिंपुटी वांयां-विण ॥२॥ क्रिया कर्म धर्म तुज काय चाड । जवळी असतां गोड प्रेमसुख ॥३॥ संकल्प विकल्प सांडीं तूं समूळ । राहेंरे निश्चळ क्षणभरी ॥४॥ आपुलें निजहित जाणतूं त्वरित । वासनारहित होईं वेगीं ॥५॥ नामा ह्मणे तुज ठायींचें कळतें । सोसणें कां लागतें गर्भवास ॥६॥