भजनी मालिका

भजने

अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या ॥१॥ म्हणोनि महिमा त्यांचा जगीं । वागविती अंगीं सामर्थ्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥१॥ कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वन्नाची आण तया काई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अभक्ताचे स्थळीं भ्रांताची संगती । परदारा चित्तीं परनिंदा ॥१॥ नेणे भूतदया शांतीचे लक्षण । कार्या कारन बोलतरे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें ॥१॥ अक्षरांची संख्या बोलिले उदंड । मेरू सुप्रचंड शर आदि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अभय उत्तरी संतीं केलें दान । झालें समाधान चित्त तेणें ॥१॥ आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अभयदान मज देईं वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा ॥१॥ ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभाग्य न भजती भगवंतीं । त्यांसी पृथ्वीं असे जडत्व देती । जळें दिधली त्या अधोगती तेजें दिधली त्या संतापवृत्ति ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाच्चपण देह त्याचा ॥१॥ असोनि संसारीं प्रेतवत देहे । काळ मुखा वाहे भार सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभाविकांचे कर्म । तया न कळे कांहीं वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥ हरुषें मुखें नाम गाय । तया म्हणती वेडा होय अभाविकांचें भय । जन मनीं वाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभिनव गुरुनें दाखविलें । ओहं सोहं माझें गिळिलें ॥१॥ प्रपंचाचें उगवोनि जाळें । केलें षडवैरीयांचें तोंड काळें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥ नवल कृपेंचें विंदान कैसें । जनार्दनें सरसें केलें मज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अभिनव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥ रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम