भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाच्चपण देह त्याचा

abhavik yasi na ruche bhajan | sada pishachchapan deh tyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाच्चपण देह त्याचा ॥१॥ असोनि संसारीं प्रेतवत देहे । काळ मुखा वाहे भार सदा ॥२॥ जगीं अपकीर्ति फजितीचें जिणें । सदा तें लपणें श्वानापरी ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें तें पामर । भोगिती अघोर कल्पकोटी ॥४॥