भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा

abhagiyan navade vaishnavancha sang | sada to udyog paranindecha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा ॥१॥ ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे त्यासी ॥२॥ जन्मोनी मरती पुन्हा जन्मा येती । होतसे फजिती मागें पुढें ॥३॥ एका जनार्दनीं नरकाचें बिढार । यमाचें तें घर माहेर केलें ॥४॥