भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभयदान मज देईं वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा

abhayadan maj dein vo datara | krupechya sagara mayabapa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभयदान मज देईं वो दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥ सेवाभक्तिहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे तुझे नाम दिनानाथ । ते मज उचित करी आता ॥३॥