भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली

abhaktache ganvin sadhu mhanaje kay | vyaghravadan gay sampadali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥१॥ कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वन्नाची आण तया काई ॥ध्रु.॥ मोतियाची गोणी माळे वोळी नेदी । पुस्ती केली केवढ्या पसरी हे ॥२॥ केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥३॥ तुका म्हणे खीर केली काऱ्हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥२॥