वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी
varma tari amhan dava | kay deva janen mi
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
varma tari amhan dava | kay deva janen mi
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
varma davi sopen bhavikan gopalan | vahe tyanchya galan pale mala
वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥ मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥
valatya gai dhanve ghara | amachya kari yerajhara
वळत्या गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥
valiten jen gai | tyasi phar lage kai
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥
vasanen thillarin | beduk sagara dhikkari
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥ नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥
vasavaven ghar | deven baren nirantar
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥
vaitanen bhalen | hinen davilen changalen
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥ एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥
vakhar gheuni alen | tyasi taravarenen halen
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥१॥ नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥
vaghacha kalabhut dise vaghaaisa | pari nahin dasha sach angin
वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥
vaghen upadeshila kolha | sukhen khaun dyaven mala
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥१॥ अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥
vachachapalye bahu jalon kushal | nahin bijamul hata alen
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥ म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥
vachal latike abhakta je khal | apulen ten bal vakhanave
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखानावे ॥१॥ बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥
vache viththal nahin | tochi pretarup pahin
वाचे विठ्ठल नाहीं । तोचि प्रेतरूप पाहीं ॥१॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥
vachechiya ala kavilalen bramha | chukavila shram pruthak to
वाचेचिया आळा कविळलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥ सुलभ झालें सुलभ झालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥
vajatil turen | yenen ananden gajaren
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥ जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥
vanja gai dubhati | deva aisi tujhi khyati
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥ ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥
vanjhenen davilen garhavar lakshan | chiraguten ghalun vathayala
वांझेनें दाविलें गऱ्हवार लक्षण । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥ तेवीं शब्द झनी करिती चावटी । ज्ञान पोटासाठी विकूनियां ॥ध्रु.॥
vat davi tyachen gelen kay | nagavala jo varitan jay
वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥ ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा॥ध्रु.॥
vat pahen hari kan naye ajhuni | nishthur kan manin dhariyelen
वाट पाहें हरी कां नये आझूनि । निष्ठुर कां मनीं धरियेलें ॥१॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥
vat vaikunthin pahati | bhakta kain pan yethen yeti | tayan janmamaranakhanti | nahin chittin paralok
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥ धन्यधन्य हरीचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥