भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक

vat vaikunthin pahati | bhakta kain pan yethen yeti | tayan janmamaranakhanti | nahin chittin paralok

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥ धन्यधन्य हरीचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥ कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस। वाट कर जोडोनियां ॥२॥ रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरीभक्तां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥ असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥ सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका म्हणे दरुषणें ॥५॥