भजनी मालिका
← भजनांकडे परत

वसवावें घर । देवें बरें निरंतर

vasavaven ghar | deven baren nirantar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥ . संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥ तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥