भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला

vaghen upadeshila kolha | sukhen khaun dyaven mala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥१॥ अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥ येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥ देह तंव जाणार । घडेल हा परउपकार ॥३॥ येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥ गांठी पडली ठका ठका । त्याचे वर्म जाणे तुका ॥५॥