भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥ काय तिनें तपमुद्रा धरियेली । म्हणोनियां झाली भृंगीं अंगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेट देईं मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचें ॥१॥ पेंद्यासी पुसती अवघे गडी तेव्हां । कोणरे हा बावा आला येथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेटसी केधवां माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा ॥१॥ चित्त निरंतरीं तुझे महाद्वारीं । अखंड पंढरी ह्रदयीं वसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेटीची आवडी उत्कंठित चित्त । न राहे निवांत एके ठायीं ॥१॥ जया देखे तया हेंचि पुसे मात । कां मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे तें लक्षण भज-नाचें ॥१॥ विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचें कौतुक कैसें सांगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळीं । वासना वोंगळी तेचि करी ॥१॥ वासनेचि थोरी सांगवेना कांहीं । न सुटिजे कांहीं कोण्या काळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भोगावती तीरीं दिधला मंडप । साधू आपरूप पांडूरंग ॥१॥ रखुमाई राही वैसल्या अनेक । सखा पांडुरंग उतरला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भोगावरी आम्ही घातिला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ नाहीं यासी पतन् न होय बंधन । नित्य हेंचि स्नान राचनामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भोंवतालें जाळें घाली नेटेंपाटें । हस्तकीं तिखट बाण धरी ॥१॥ येतील उदकपानासी सावजें । पाहे त्याचे व्याजें रोखोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें । श्रवण मनन होउनी ठेलें ॥१॥ बापें बोधिलें बापें बोधिली । बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मग अष्टदिशा व्यापुनी । तीर्थें राहिली स्थानीं स्थानीं । आळंकापुरीं पाटणी । इंद्रायणीचां तटीं ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

मग केशव म्हणे माझें परिसा वचन । गुज मी सांगेन अंतरीचे ॥१॥ व्रत तप दान सकळ कर्मक्रिया । एक भूतदया असे जेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मग जाला स्वयंपाक स्नानविधि सारा । सकळां हांकारा जाणविला ॥१॥ आले महाद्वारीम दिधलीं आसनें । पूजा नारायणें आरंभिली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मग नारदातेम पुसे सत्यभामा देवी । विस्मयो माझ्या जीवीं अति वाटे ॥१॥ सांडोनियां थोरी देव मुगुटमणी । नाचतो कीर्तनीं संतांपुढे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मग पंढरीनाथ म्हणे नामयासी । तूं जाई गोणाईसी घेऊनियां ॥१॥ अतिशय कांज इणें मांडिलासे फार । मातेसि निष्ठुर होऊं नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मग लावूनियां नेत्र निर्धारु पैं केला । ह्र्दयीं आठविला केशीराज ॥१॥ तूं इष्ट मित्र बंधु सोयरा जननी जनकु । नेणें मी आणिकु तुजवांचोनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव