भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

ऐसें ऐकोनियां प्रेमा आला पोटीं । म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची ॥१॥ येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ । श्रमुचि केवळ जाणिवेचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें ऐकोनियां राजाई ते आली । रोषें येऊनि बोली बोलातसे ॥१॥ देवानें हें दिलें तुम्ही कां पाठवा । काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें ऐकोनी नामा विचारी मानसीं । काय द्यावेम यासी प्रतिवचन ॥१॥ विठोबाचे पाय आठविले मनीं । बोले अमृतवचनीं तयाप्रति ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें कांहीं एक अपूर्व देखिलें । ह्रदयीं कोंदाटलें मूर्तिरूप ॥१॥ परी तें कांहीं तैसें न राहे निश्चळ । चित्त तें चंचळ मावारलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें झालें पूर्ण ध्रुवाचें आख्यान । ऐकती जर जन एका भावें ॥१॥ तयावरी कृपा देवाची होईल । केलें तें लाभेल सर्व काज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें तीर्थ कोणी दाखवा गोमटें । जेथें प्रत्यक्ष हें भेटे परब्रह्म ॥१॥ कोठें ऐसें क्षेत्र आहे त्रिभुवनीं । सकळां शिरोमणि चंद्रभागा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरि-कथेचा ॥१॥ तें एक पंढरी विख्यात त्रिभुवनीं । सकळां शिरोमणी चंद्रभागा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु । ह्रदयीं तो अनुरागु आवडीचा ॥१॥ प्रेमें वोसंडत करितो स्वहितगोष्टी । द्राविती कसोटी अनुभवाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें परियेसिलें विठठलें । तंव रुक्मिणीनें विनविलें । याचें करिजो जी म्हणितलें । हाकारिजो पुंडलिका ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें पांडुरंग बोलिले । मग सकळ तीर्थांसी सांगितलें । आळंकापुरीं वसिजो वहिलें । भक्त तारावया ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें बहुत काळ लोटलियावरी । पुण्याची सामोग्रीं हारपली ॥१॥ मरोनियां जन्म हरणाचा पावला । पतिव्रता झाल्या कुरंगिणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी गोपाळा । कां स्नेह लावियेला पूर्वींहुनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसें वदोनि पांडुरंगें । समस्तांसी वस्त्रें दिली अंगें । देऊनि भूषणें अनेगें । रत्नमुक्ताफळें अलंकार ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसे सुखरुप दोघे चालताती मार्गीं । परी चित्त पांडुरंगीं नामयाचें ॥१॥ क्षणाक्षणा वास परतोनी पाहे । वियोग न साहे पंढरीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव