भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें वदोनि पांडुरंगें । समस्तांसी वस्त्रें दिली अंगें

aisen vadoni pandurangen | samastansi vastren dili angen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें वदोनि पांडुरंगें । समस्तांसी वस्त्रें दिली अंगें । देऊनि भूषणें अनेगें । रत्नमुक्ताफळें अलंकार ॥१॥ धन्य जन्मले भूमंडळीं । कीर्तनीं नाचती गदारोळी । ते विष्णुसन्निध सर्वकाळीं । ऐसें वनमाळी बोलिले ॥२॥ राही रुक्मिणी सत्यभामा । विचारिती पुरुषोत्तमा । बहुत विठोजी जंववरी धरा । तंववरि समाधि स्थिरा । हरिकीर्तन करितो सैरा । चतुर्भुज होईल ॥४॥ हें शिवपीठ शिवाचें । हेंचि पूर्वस्थान अगस्तीचें । जाणोनि जन्म जाले चौघांचे । सर्व क्षेत्रांची आदिभूमि ॥५॥ पूर्वापार युगायुगीं । अनेक पुण्यें घडले यागीं । तपें तपिन्नलें महायोगी । तो हा आळंकापुरें ठावो ॥६॥ येथें रामकृष्ण कथा । जो करील सर्वथा । तो पुढें पवेल व्यथा । भवबंधापासुनी सुटेल ॥७॥ सप्तद्वीप नवखंड । आणि अवघें गणितां ब्रह्मांड । त्याहूनि हें हो उदंड । पुण्य जोडेल नामें ॥८॥ ऐसें उत्तमोत्तम थोर । सकळ जीवांचे माहेर । नाम घेतां तरती चराचर । दिला वर रुक्मिणीवरें ॥९॥ नामा म्हणे देवराव । महिमा सांगतसे भाव । धन्य आळंकापुरी गांव । आदि ठाव वरिष्ठ ॥१०॥