भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें झालें पूर्ण ध्रुवाचें आख्यान । ऐकती जर जन एका भावें

aisen jhalen purna dhruvachen akhyan | aikati jar jan eka bhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें झालें पूर्ण ध्रुवाचें आख्यान । ऐकती जर जन एका भावें ॥१॥ तयावरी कृपा देवाची होईल । केलें तें लाभेल सर्व काज ॥२॥ पुत्राभिष्ट पुत्र धनाभिष्ट श्वन । जैसें ज्याचें मन तैसें होय ॥३॥ नामा म्हणे तया कल्याण सर्वदा । चिंतितां गोविंदा काम पुरे ॥४॥