भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

नामयाची जनी दासी पैं म्हणती । भावें तो श्रीपती वश केला ॥१॥ दासीचा हा शब्द पूर्वापार आहे । पुराणीं हा पाहे निवाडा तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामयाचें घर मोडलें एके दिनीं । मजुर तयालागुनी मिळेचिना ॥१॥ हिंडतां भागलें मजूर न मिळे । आले ते सकळ गृहालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको ॥१॥ आपणांसी देवें द्रव्य हें दिधलें । तूं कां म्हणसी वहिलें द्यावें तया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामरुप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार नोहें उतराई ॥१॥ भक्तांचे उपकार कशानें फेडीं । यालागीं त्याचें उच्छिष्ट काढी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥ वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणें । यातना भोगणें यमपुरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामस्मरण अहो जना । तेणें तुटें भवबंधना । येचि देहि येचि काळीं । भजीजे रे नाम जाण ॥१॥ ध्रुव अजामेळ गणिका । नाममात्रें तारिले देखा । आणिकाही भक्त देखा । मोक्ष पावले नामें एका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामस्मरण हरिकीर्तन । एकादशीचा व्रत हरिजागरण । द्वादशी क्षीरापती सेवन । सुकृता त्या पार नाहीं ॥१॥ घडतां तिन्ही साधन । कलिमाजीं तो पावन । त्याच्या अनुग्रहें करुन । तरती जन असंख्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामा आणि दामा बाप लेक दोन्ही । राजाई गोणाई । सासु सुना ॥१॥ नारा महादा गोंदा विठा चवघे पुत्र । जन्मले पवित्र हरिभक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचा उच्चार करितां कोण्ही हांसे । तयासी होतसे नरकवास ॥१॥ साबडे बोबडे गावोत भलते । परि ते सरते पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचें धारक विष्णुरुप देख । त्रिभुवनीचें सुख तये ठायीं ॥१॥ ब्रह्मा विष्णु हर येताती सामोरे । नामधारक निर्धारे तया वंद्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचे पोवाडे वर्णिती साबडे । हरिनामें बागडे रंगले ते ॥१॥ नामापरतें आन नेणती सर्वथा । साधन चळथा वायां जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचें महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी ॥१॥ पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन नामें जाहला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाच्या उच्चारें प्रल्हाद तारिला । अजामेळ गणिकेचा उद्धार केला ॥१॥ तें नाम सोपें श्रीरामाचें । निरंतर वाचे जप करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामापाठ माधव सदा तूं उच्चारी । माधव अंतरीं धरुनी राहे ॥१। माधवा माधवा आठवी यादवा । आणिक धांवा धांवा करुं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामापाशीं तिष्ठे देव । नामापाशीं वसे भाव । नामापाशी मुक्ति गौरव । अहर्निशीं वसतसे ॥१॥ नामापाशी ऋद्धिसिद्ध । नामापाशीं ते समाधी । नामें तुटती उपाधी । जन्मोजन्मीच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग जैसें ॥१॥ प्राकृत हे जन भुललें विषया । नामाविण वांया जाती देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ