भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे

namavin mukh sarpachen ten bil | jivha navhe kalasarpa ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥ वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणें । यातना भोगणें यमपुरी ॥२॥ वैष्णवांचें गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहतां नाहीं ॥३॥ आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥ एकाकार झाले जीव तेचि दोन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥